पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचे निमंत्रण न आल्याने पवारांचा तिळपापड!

105
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे भाषण ऐकून आपण अवाक झालो. कारण एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात अन दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात. त्यांना पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे शरद पवार हताशपणे बोलले, असा गंभीर आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला.

पावसात भिजूनही पवारांनी ५४ आमदार निवडून आणले 

आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर यामुळेच त्यांचा राग  आहे. माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की, शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो यांना देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणले. त्यामुळेच प्रस्थापितांचा तिळपापड होत आहे. म्हणूनच आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या नजरेत खुपतात. मी पवार यांना सांगू इच्छितो की,  फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाचे  १०५ आमदार तर शिवसेनेचे ५६ अशे एकूण १६१ आमदार महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पुन्हा आणण्याकरताच निवडून दिले होते. पण आपल्या नेतृत्वात पावसात भिजून सुद्धा फक्त ५४ इतकेच आमदार निवडून आले, असेही पडळकर म्हणाले.

राष्ट्रवादीला मुख्यमंत्री बनतात आला नाही 

त्यामुळे जनतेने तुम्हालाच निवडून दिले, अशा खोट्या थापा मारू नका. आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या तीस वर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रावादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती भूमिका घेणे सोपं असतं, पण लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणं कठीण असतं, असेही पडळकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.