रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले! जाणून घ्या दर…

153

युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम आता भारतीय बाजारावर दिसू लागला आहे. या युद्धामुळे सोने-चांदीच्या किंमती वाढल्या असून सोन्याचा आजचा दर 54 हजार रुपये प्रतितोळे आहे.

( हेही वाचा : उकडतंय म्हणून मोकळी हवाही मुंबईकर घेऊ शकत नाहीत, का ते वाचा )

युक्रेन रशिया युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या दरात कमालीची घट झाली होती. युद्धाआधी सोन्याचा प्रति तोळा भाव 48 हजारांच्या जवळपास होता. आता 24 कॅरेट सोन्याचा भाव 54 हजारांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 49,400 इतका आहे. मागील 12 दिवसात सोन्याचे भाव युद्धामुळे वाढलेले पाहायला मिळत आहेत. युद्ध पुढील काही दिवस असेच सुरू राहिले तर सोन्याचा भाव 58 हजारांच्या जवळपास जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधी कोरोनाच्या काळात सोन्याचा भाव 58 हजारांपर्यत गेला होता.

( हेही वाचा : कुलाब्यात रात्रभर वीज गायब! नागरिक त्रस्त )

सर्वाधिक वाढ

रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील जोखीम भावना वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लोक सोन्यात मोठी गुंतवणूक करत आहेत. 28 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 50,760 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे 1,789 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, चांदीचा भाव 70 हजार 700 रुपये प्रतिकिलो आहे. सराफा बाजार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मे 2021 पासून सोन्याच्या किंमतीतील ही सर्वात मोठी साप्ताहिक वाढ आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.