अंधेरीत डान्स बारवर छापा, १८ मुली ताब्यात, २९ जणांवर कारवाई

122

अंधेरीतील आंबोली येथील सदानंद (स्टार इन) डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकत १८ मुलींना ताब्यात घेतले. यासोबतच पथकाने २९ जणांवर कारवाई केली आहे.

शनिवारी केली पथकाने कारवाई

मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कानवडे आणि त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री ही कारवाई केली.

(हेही वाचा – International Women’s Day: महिला पोलिसांसाठी ‘ही’ अनोखी भेट)

१६ ग्राहकांवर कारवाई

या कारवाईत पथकाने ७७,४३० रुपये रोख, एक ॲम्प्लीफायर, एक लॅपटॉप, एक स्पीकर आणि एक मेमरी कार्ड जप्त केले आहे. तसेच यात एक बार चालक, एक बार मॅनेजर, एक बार मॅन, आठ स्टुअर्ट वेटर्स, दोन ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट आणि १६ ग्राहकांवर देखील कारवाई केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.