एसटी संपाचं ‘ते’ पत्र व्हायरल; कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार? महामंडाळानं दिलं स्पष्टीकरण

138

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप अनेक महिन्यांपासून सुरू असून त्यावर राज्य सरकारने अद्याप तोडगा काढला नसल्याने, संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. असे असले तरी राज्य सरकारने अद्याप कोणताही तोडगा काढत नसल्याने अनेक कर्मचारी पुन्हा कामावर रूजू झाल्याचे पाहायला मिळत आहेत. दरम्यान, एसटीच्या संपाबाबत एक गोपणीय पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. मात्र आता याच पत्रावर महामंडळाकडून ते व्हायरल होणारं पत्र बनावट असल्याचे सांगितले जात असून त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

(हेही वाचा – स्थायी समितीने राखून ठेवलेल्या प्रस्तावांना प्रशासक देणार मंजुरी )

एसटी संपादरम्यान, एसटी महामंडळाचे कोट्यावधींचे नुकसान झाल्याचे राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले तर त्यांनी कित्येकदा संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आवाहनदेखील केले आहे. तसेच कर्मचा-यांना गोड बोलून कामावर घेतले जात आहे. त्याचबरोबर मी बेकायदेशीर संपात सहभागी होतो असा आशय असलेल्या पत्रावर जबरदस्तीने स्वाक्षरी देखील घेतली जात आहे. त्यामुळे नेमकं हे राज्य सरकारचं पत्र आहे की अन्य कुणी तयार करून ते व्हायरल करत आहे, याबाबत कुठलीही स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे त्या पत्राची एसटी कर्मचा-यांमध्ये अधिक चर्चा आहे.

हे आहे व्हायरल होणार पत्र

letter

काय म्हटले आहे पत्रात…

  • एका बाजूला परिवहन मंत्री एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी आवाहन करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय अधिकारी गोपनीय आदेश काढून हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्याचे सांगत आहे.
  • कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून आम्ही संपात सहभागी होतो आता मी संपातून बाहेर पडलो असून मला कामावर हजर करुन घेण्यात यावे, असे जबरदस्तीने लिहून घेण्यात येत आहे.
  • आणि हजर करुन घेतले की संपात सहभागी असल्याने एसटीचे नुकसान झाले म्हणून प्रत्येकी पाच ते सहा लाख रुपयांची चार्जशीट देण्यात येत आहे, असा आरोप कर्मचाऱ्यांकडून होताना दिसतोय.

महामंडळाचे स्पष्टीकरण…

एसटी महामंडळाने व्हायरल होणाऱ्या पत्रावर स्पष्टीकरण दिले आहे. हे परिपत्रक पूर्णत: खोटे व बनावट असून कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रूजू होण्यापासून अटकाव करण्यासाठी हे बनावट पत्र व्हायरल केले असल्याचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी म्हटले. एसटी महामंडळाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. येत्या 10 मार्च 2022 पर्यंत कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

MSRTC 1

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.