धक्कादायक! नातेवाईकांसमोर मुलीचे केले अपहरण

98

बंदुकीची गोळी हवेत झाडून दोन युवकांनी युवतीला पळवून नेल्याची खळबळजनक घटना अमरावती शहरातल्या बालाजी प्लॉट येथे सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली. या प्रकरणी सध्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून युवती व दोन युवकांचा अद्यापही शोध लागलेला नाही.

असा घडला प्रकार

नागपुरात राहणारी तरुणी तिच्या मोठ्या बहिणीच्या बालाजी प्लॉट येथील घरी एका कार्यक्रमाला आली होती. रात्री दोन तरुण दुचाकीवर तेथे आले. तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नातेवाईकांनी विरोध केल्यावर एका तरुणाने कमरेला लटकवलेले पिस्तुल काढून हवेत दोन गोळ्या झाडून, तरुणीला बळजबरीने गाडीवर बसवले आणि पळवून नेले.

( हेही वाचा: आयकर विभागच्या रडारवर आता अनिल परबांचे निकटवर्तीय! )

शोध सुरु

पोलिसांना माहिती मिळताच, संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान नांदगाव पेठ टोलनाक्यावर दोन मुलांना अटक करण्यात आली. प्रफुल्ल दमाये (20) आणि प्रमेश आटपाका (32) अशी त्यांची नावे असून दोघेही नागपूरचे रहिवाशी आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेत गोळीबार करणाऱ्या मुलाचे या मुलीशी प्रेमसंबंध आहेत. नागपूरहून चार मित्र आले होते. दोन मित्र दुचाकीने बालाजी प्लॉटमध्ये आले. अन्य दोन नांदगाव पेठ टोलनाक्यावर थांबले. ज्या मुलाचे या मुलीशी प्रेमसंबंध होते, त्या मुलाने हवेत गोळीबार करत, युवतीला घेऊन पळ काढला. पोलीस तरुणीसह दोन्ही तरुणांचा कसून शोध घेत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.