एसटीच्या कर्मचा-यांसाठी पडळकर-खोत पुन्हा सक्रीय! संप चिघळणार का?

86

राज्य परिवहन महामंडळाच्या संपकरी कामगारांवर कारवाई केली जात आहे, संपावर गेलेल्या कामगारांना पुन्हा कामावर रूजू होण्याची इच्छा केली, मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे पत्र सध्या व्हायरल होते, त्यावरून महामंडळाच्या आंदोलनाचे सुरूवातील नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार सदाभाऊ खोत पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांनी महामंडळाचा पुन्हा निषेध केला आहे.

‘त्या’ गोपनीय पत्राने संताप

जे महामंडळाचे कामगार संपावर आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी महामंडळाचे पत्र सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. त्यामध्ये संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होऊ द्या आणि ते कामावर आल्यावर त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश देणारे महामंडळाचे एक गोपनीय पत्र उघड झाले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र व्हायरल होणारे हे पत्र खोटे असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे. त्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मात्र या पत्राची होळी केली. तसेच एसटीच्या विलीनीकरणाबाबत त्रिसदस्यीय समितीचा अहवालही जाळला.

(हेही वाचा मलिकांच्या राजीनाम्यासाठी आता भाजप रस्त्यावर)

महामंडळातील काळे आहे वाझे

त्यामुळे पोलिसांनी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना ताब्यात घेतले. व्हायरल होणाऱ्या या पत्राविरोधात पडळकर आणि खोत यांनी आवाज उठवला. माधव काळे हे एसटी महामंडळातील वाझे असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. माधव काळे हा कोणाची वसूली करतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. अधिवेशनात आम्ही याविरोधात आवाज उठवणार आहोत, असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.