महाविकास आघाडी सरकार वसुलीमध्ये रमलंय, दरेकरांचा घणाघात

138

महाविकास आघाडी सरकार वसुलीमध्ये रमलं आहे. या सरकारला आंदोलनकर्त्यांचं काही पडलेलं नाही. अशा सरकारला अधिवेशनात पूर्ण ताकदीने जाब विचारून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

या आंदोलनाला ताकद देणार

सरकारच्या संवेदना हरपल्या आहेत. आज दीड ते दोन महिने एसटी कर्मचारी आंदोलन करतायत. ऐंशीच्या वर आंदोलनकर्त्यांनी आत्महत्या केल्या, अन्नत्याग केले, अर्धनग्न आंदोलन केले. त्यासाठी आता या सरकारला जाब विचारण्याची आवश्यकता आहे. एसटी कर्मचारी देशोधडीला लागला आहे. महाविकास आघाडी सरकार एसटी विलीनीकरण करणार नाही असे बेदरकापणे सांगत आहेत. परंतु, झालेल्या आत्महत्येचं काय? या कर्मचाऱ्यांचे कुटुंब कसे चालणार? यांचा विचार कोण करणार असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. येत्या काळात गोपीनाथ पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षित मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलनात सहभागी होऊन या आंदोलनाला ताकद देणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

(हेही वाचा – आयकर विभागच्या रडारवर आता अनिल परबांचे निकटवर्तीय!)

खोत आणि पडळकरांकडून महामंडळाचा निषेध

राज्य परिवहन महामंडळाच्या संपकरी कामगारांवर कारवाई केली जात आहे, संपावर गेलेल्या कामगारांना पुन्हा कामावर रूजू होण्याची इच्छा केली, मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे पत्र सध्या व्हायरल होते, त्यावरून महामंडळाच्या आंदोलनाचे सुरूवातील नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार सदाभाऊ खोत पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांनी महामंडळाचा पुन्हा निषेध केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.