महिला क्रिकेट खेडाळूंना प्रोत्साहन देण्यासाठी आकाशवाणीने घेतला मोठा निर्णय!

105

आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने या स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून, आयसीसी 2022 महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेते बनण्याच्या दिशेने कूच केली आहे. आपल्या महिला क्रिकेट संघाची ही अभिमानास्पद घोडदौड तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेचे थेट प्रसारण आकाशवाणीवर समालोचनाच्या माध्यमातून प्रसार भारती करत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सुरू झालेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2022 चे समालोचन आकाशवाणीद्वारे त्यांच्या देशभरातील सर्व प्राथमिक वाहिन्या, एआयआर एफएम रेनबो नेटवर्क, डीआरएम आणि डीटीएच वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे.

( हेही वाचा : International Women’s Day: महाराष्ट्रातील ‘या’ ३ महिलांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव )

दर्शकांना आकाशवाणीवर खिळवून ठेवण्यासाठी, हे अभ्यासपूर्ण कार्यक्रम सामने सुरू होण्यापूर्वी, विश्रांती दरम्यान आणि सामन्यानंतर प्रसारित केले जातील. डिजिटल प्रेक्षकांसाठी, हे कार्यक्रम प्रसार भारती स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीवर देखील उपलब्ध असतील – https://www.youtube.com/c/PrasarBharatiSports

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.