मंगळवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, शिर्डी देवस्थानचे विश्वस्त आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. या छापेमारीनंतर भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत, सेनेचा एक जुना नेता या छापेमारीवर खूश असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सेनेचा हा नेता नेमका कोण? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राणेंच्या ट्वीटने चर्चा
मंगळवारी आयकर विभागाच्या झालेल्या या धाडसत्रानंतर, आता नितेश राणे यांनी ट्वीट करत, राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने टाकलेल्या धाडीनंतर शिवसेनेचा जुना नेता खुश असल्याचं म्हटलं आहे. तसेच, या धाडीनंतर मला अनेक फोन आले आणि त्यांनी “लगे रहो” असं सांगितल्याचं, नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे. त्यामुळे सेनेचा हा नेता कोण अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Old guard in the sena is super happy because of the Kanal IT raids..
Got so many calls .. telling me ..
LAGE RAHO!! 😅😅— nitesh rane (@NiteshNRane) March 9, 2022
( हेही वाचा आता ‘या’वर पण ‘कर’ आकारणार का? न्यायालयाचा प्राप्तीकर विभागाला प्रश्न! )
आयकर विभागाचे धाडसत्र
मंगळवारी शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला. त्यानंतर थोड्याच वेळात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली. तसेच, नंतर परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरीही आयकर विभाग धडकलं.