“आपण एकत्र लढू”, राऊतांचा राहुल गांधींना मदतीचा ‘हात’

164

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे समर्थन केल्याबद्दल आभार मानले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्र लिहिले असून त्यामध्ये त्यांनी काँग्रेस त्यांच्या पक्षासोबत असल्याची ग्वाही दिली आहे. या पत्राला उत्तर देताना संजय राऊत यांनी राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत. मंगळवारी पत्रकार परिषदेत राऊत यांनी भाजपवर आरोप केले. यानंतर आता राहुल गांधींनी राऊतांना पत्र लिहून मी तुमच्या पाठिशी असल्याचं सांगितले आहे. अशातच गांधीच्या पत्राला उत्तर देत आपण एकत्र लढू असे म्हणत, राऊतांनी राहुल गांधींना मदतीचा ‘हात’ दिला आहे.

काय म्हणाले राऊत…

महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलंच रंगल आहे. अधिवेशात गौप्यस्फोटांची मालिका सुरू असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे तर दुसरीकडे आयकर विभागाच्या छापासत्रांनी महाविकास आघाडीतील नेते आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या नाकीनऊ आले आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय संघटनांवर मोठे आरोप केले आहेत. लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला एकत्र लढावे लागेल. केंद्रीय तपास यंत्रणा एका पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत हे केवळ दुर्दैवी नाही तर धोकादायकही असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यासह त्यांनी खात्री व्यक्त करत हे सुद्धा पार पडेल, असे म्हटले आहे.

(हेही वाचा – महापालिका निवडणूक भाजप मिशन: महापालिका १३४, भाजप १३४ प्लस)

राहुल गांधींनी पत्रात काय म्हटले?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना पत्र पाठवले. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय तपास यंत्रणा टार्गेट करत आहेत. यातून मोदी सरकार विरोधकांना गप्प करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी असून कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही. काँग्रेसच्या वतीने मी तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवत आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.