रायगड जिल्ह्यातील महाड येथील इसाने कांबळे गाव हद्दीतील दगड खाणीत मोठा स्फोट झाला आहे. माणगाव येथे जप्त करण्यात आलेली स्फोटके निकामी करताना हा स्फोट झाला आहे. बॉम्बशोधक आणि विनाशक पथकाचे तीन जवान यामध्ये गंभीर जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी उशिरा ही दुर्घटना घडली.
रुग्णालयात उपचार सुरु
पोलीस निरिक्षक रमेश कुते आणि हेड कॉन्स्टेबल आशीर्वाद लडगे अशी गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावं असून त्यांना अधिक उपचारांसाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. तर कॉन्स्टेबल राकेश दोशी हे जखमी असून, त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
( हेही वाचा ‘तुरूंगातील मंत्री…पाताळयंत्री’ मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा धडक मोर्चा! )
पुढील तपास सुरु
मात्र स्फोटाची तिव्रता इतकी भंयकर होती की जवळ जवळ ८ ते दहा किलोमीटर परिसरात घरांच्या खिडकीच्या काचा हादरल्या असून, शेजारील इसाने कांबले गावचे नागरिक भयभित झाले असून, काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळत होते, मात्र स्थानिक आमदार भरतशेट गोगावले प्रांत आधिकारी प्रतिमा पुदलवाड सहाय्यक पोलीस अधिक्षक निलेश तांबे तहसिलदार सुरेश काशिद एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आंधले यांनी नागरिकांना शांत केले असून, पुढील तपास सुरू आहे.
Join Our WhatsApp Community