महाराष्ट्राला कराची समोर झुकू देणार नाही! आशिष शेलारांचा घणाघात

117

कोरोनानंतर भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात मोठा मोर्चा आहे. मुंबईवरील हल्ला आम्ही कधीच विसरु शकणार नाही, १२ मार्च रोजी १२ बॉम्बस्फोट झाले, त्याचा मास्टरमाईंड दाऊद होता. हा जनआक्रोश मोर्चा आहे, कोणत्या मागणीसाठी हा मोर्चा नाही, ठाकरे सरकारमधील लुच्चा मंत्री आहे जो यातीस आरोपीला फाशी देऊ नका म्हणत होता, त्याच्या मांडीला मांडी लावून ठाकरे सरकार बसले आहे, दुसरा मंत्री बॉम्बस्फोटातील आरोपीशी व्यवहार करत आहे, वरती म्हणत आहेत, महाराष्ट्र झुकणार नाही. महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही. साडे तीन जिल्हा म्हणजे महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राला कराची समोर झुकू देणार नाही, असा घणाघाती हल्ला भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपाचा बुधवारी, ९ मार्च रोजी आझाद मैदानात नवाब मलिक हटाओ, महाराष्ट्र बचाओ मोर्चा काढला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा इत्यादी उपस्थित होते.

(हेही वाचा जब तक मलिक का इस्तिफा नही आता है, हम न रुकनेवाले, न झुकनेवाले है!)

दळभद्री सरकार उलथवून टाकणार! – सुधीर मुनगटीवार

लोकशाही मार्गाने आम्ही दळभद्री सरकार उलथवून टाकणार आहे, पियो वाइन रहो फाइन म्हणणारे नादान लोक एकीकडे आहे आणि दुसरीकडे राष्ट्रभक्त आहेत. हे धर्मयुद्ध आहे. जे आतंकवाद्यासोबत व्यवहार करतात, ते मंत्री या सरकारमध्ये आहेत. ज्या देशाचा देशभक्त आतंकवादाची घटना विसरतो, तो कधीच देशाचे रक्षण करू शकत नाही, तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळी मृत्यूमुखी पडलेल्यांची काळजी वाटत नाही, त्यांना चिंता मतांची होती, पांडवांचा भाऊ कर्ण दुर्योधनासोबत जाऊन बसला आहे, तरीही त्यांचा नाश होणार, असे भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार म्हणाले.

दाऊदच्या दबावाला बळी पडून मलिकांना संरक्षण – चंद्रकांत पाटील

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेतला, अनिल देशमुखांचाही राजीनामा घेतला, मलिक यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय झाला, पण घोषणा करण्याआधी अचानक निर्णय बदलला, कारण तेव्हा कुणाचा तरी फोन आला होता, तो फोन दाऊदचा आला होता. त्यांना दाऊदच्या दबावाला बळी पडून नवाब मलिक यांना वाचवायचे आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.