नवदुर्गा सांस्कृतिक मंडळाकडून असा साजरा करण्यात आला महिला दिन!

181

मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमीत्त वेगवेगळ्या पद्धतीने महिलांना अभिवादन करण्यात आले. अनेक ठिकाणी कार्यक्रम राबवून, महिलांचा सन्मान करण्यात आला. मात्र नवदुर्गा सांस्कृतिक मंडळाकडून निराळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला. कांदिवली पश्चिम चारकोप सेक्टर ८ येथील चारकोप ओम साई दर्शन संचालित नवदुर्गा सांस्कृतिक मंडळाच्या महिलांनी यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत, आईजी देवी केअर फाउंडेशनच्या सिनिअर सिटीझन केअरिंग सेंटर, चारकोप कांदिवली येथे भेट दिली.

पुन्हा भेट देण्याचे आमंत्रण

तसेच तेथील वयोवृद्ध महिलांची विचारपूस केली.  त्यांना खाऊ आणि भेटवस्तू दिल्या, त्यांच्या सोबत गप्पागोष्टीसुद्धा केल्या. आईजी देवी केअर फाउंडेशनला भेट दिल्याबद्दल तेथील जेष्ठ मंडळीनी या महिलांना शुभाआशिर्वाद दिले. तसेच पुन्हा आईजी देवी केअर फाउंडेशनला भेट देण्याचेही सांगण्यात आले.  त्याचबरोबर सेंटरच्या संचालकांनी सर्वांना धन्यवाद दिले.

( हेही वाचा जब तक मलिक का इस्तिफा नही आता है, हम न रुकनेवाले, न झुकनेवाले है! )

सर्वत्र कौतुक करण्यात आले 

महिला दिनानिमित्त बऱ्याच ठिकाणी खेळ खेळणे आणि डान्स कार्यक्रम आपापल्या स्तरावर करतात. त्यापेक्षा काही वेगळे करण्याचा प्रयत्न नवदुर्गाच्या महिलांनी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी नवदुर्गाच्या महिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंगळवारी उत्साहात महिला दिवस आईजी देवी केअर फाउंडेशनमधल्या जेष्ठ मंडळींसोबत वेगळ्या प्रकारे साजरा केल्यामुळे एक वेगळाच आनंद महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.