प्रवाशांना अनेकवेळा रेल्वे प्रवासादरम्यान पाणी संपण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. परंतु आता लवकरच या समस्येचे निराकरण होणार असून रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या गाड्यांमध्ये जलद गतीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. क्वीक वॉटरिंग या यंत्रणेद्वारे गाड्यांमध्ये जलद गतीने पाणी भरले जाणार आहे. क्वीक वॉटरिंग प्रणाली यंत्रणा पूर्णपणे संगणकीकृत आहे. यापूर्वी जिथे गाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी दहा मिनिटे लागायचे तिथे आता नव्या यंत्रणेमुळे रेल्वेच्या सर्व बोगीमध्ये अवघ्या पाच मिनिटांत पाणी भरता येणार आहे.
( हेही वाचा : रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीयांच्या जेवणाच्या ताटावर परिणाम! )
क्वीक वॉटरिंग यंत्रणा
लवकरच ही प्रणाली सोलापूर आणि लातूर स्थानकांवर कार्यन्वित होणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही यंत्रणा बसविल्यानंतर 24 डब्यांत पाणी भरण्यास जास्त वेळ लागणार नाही. दरवर्षी उन्हाळ्यात, गाड्यांमधील पाणी संपल्यामुळे प्रवाशांकडून होणाऱ्या गोंधळाच्या अनेक तक्रारी नोंदविल्या जातात. त्यामुळे गाड्यांना अनेकदा उशीर होत होता. सोलापूर रेल्वे स्थानकांवरून सद्य स्थितीत, सुमारे 85 टक्के गाड्या ये-जा करतात. रेल्वे गाड्यांमधील पाणी संपले तर स्टेशनवरच पाणी भरले जाते. अनेक वेळा जुन्या पद्धतीने ज्या पाईपमधून पाणी भरले जात होते, त्यात नोझल नसल्यामुळे अतिरिक्त पाणी वाहून वाया जात होते. क्वीक वॉटरिंगमुळे वाया जाणाऱ्या पाण्यावर देखील आता नियंत्रण मिळवता येणार आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे.
Join Our WhatsApp Community