मुंबईचा बाप कोण?

271

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सध्या अभिनेत्री कंगना रणौतवर टिकेची झोड उठलेली असताना आता हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री अनिल विज यांनी “मुंबई काय शिवसेनेचा कौटुंबिक प्रदेश आहे का? की त्यांच्या बापाचा प्रदेश आहे? मुंबई भारताचा भाग आहे आणि कोणीही त्या ठिकाणी जाऊ शकते. जे अशाप्रकराची धमकी देतात त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. तुम्ही कोणालाही खरे बोलण्यापासून रोखू शकत नाही असे म्हणत शिवसेनेवर टीका केली. त्यामुळे या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोपावरून मुंबईचा बाप कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘कंगणा म्हणते रोख सखो तो रोख लो’

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. यानंतर सोशल मीडियावर कंगनावर जोरदार टीका झाली. दरम्यान कंगनाने अजून एक ट्विट करत धमकावणाऱ्यांना थेट आव्हान दिले. आपण ९ सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याचे सांगत कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला रोखून दाखवा असे कंगनाने म्हटले आहे.

oie 4131190n5KX7UZ

मुंबई मराठी माणसाच्या बापाची

कंगनाच्या या ट्विटनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे असे म्हटले आहे. तसेच ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुश्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. हे वचन, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

oie 5145418Ibhvqbyz 2

शिवसेनेच्या आंदोलनावर कंगनाची आगपाखड

कंगना रणौतच्या मुंबई बद्दलच्या ट्वीट विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीने ठाण्यासह मुंबईमध्ये कंगनाच्या पोस्टरला काळे फासले. तिच्या पोस्टरला जोडे मारले. त्यानंतर भडकलेल्या कंगनाने पुन्हा एक खरमरीत ट्विट करत म्हटले आहे की, “सुशांतला आणि साधूंना मारल्यानंतर आता प्रशासनाविरोधात माझे मत व्यक्त केले म्हणून माझ्या पोस्टरला जोडे मारताय… मुंबईला रक्ताची चटक लागली आहे वाटतं… “, असे कंगनाने ट्विटमध्ये लिहिले आहे. तसेच “महाराष्ट्राबद्दल हे असे प्रेम दाखवणाऱ्या सगळ्या चापलुसांनी हे लक्षात घ्या की, मराठी मनाचा अभिमान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांना मोठ्या पडद्यावर दाखवणारी हिंदी चित्रपटांच्या इतिहासातली मी पहिली अभिनेत्री दिग्दर्शक आहे. आणि याच लोकांनी या चित्रपटांना प्रदर्शित होण्याआधी विरोध केला होता.

९ तारीखला शिवसेना स्टाईल उत्तर

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत हिच्याशी व्यक्तिगत भांडण नाही आहे. तिने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे. महाराष्ट्रचा, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचा कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. कंगनाला ९ तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचा शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.