भारताच्या स्टार खेळाडूंमध्ये आपले नाव कायम राखण्यात नेहमी यशस्वी ठरलेल्या रविंद्र जडेजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नुकतचं जडेजाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 175 धावांची धमाकेदार खेळी आणि पाच विकेट अशी अष्टपैलू कामगिरी केली आहे. ही कामगिरी करुन रविंद्र जडेजा हा क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम कसोटी अष्टपैलू ठरला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवाारीत जडेजाने हा सन्मान मिळवला आहे.
रविंद्र जडेजा अव्वल स्थानी
भारत आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पावणेदोनशे धावा करत, जडेजाने फलंदाजांच्या क्रमवारीत 54 व्या स्थानावरुन 37 व्या स्थानावर झेप घेतली. फलंदाजीत कमाल करणा-या जडेजाने गोलंदाजीतही उल्लेखनीय कामगिरी केली. दोन्ही कसोटी सामने मिळून त्याने नऊ फलंदाजांना तंबूत जाण्यास भाग पाडले. त्यामुळे गोलंदाजांच्या क्रमवारीतही त्याने 17 व्या स्थानावर आपलं नाव कायम केलं आहे. फेब्रुवारी 2021 पासून पहिल्या स्थानावर कायम असणा-या वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकत, रविंद्र जडेजाने अव्वल स्थान मिळवले आहे.
( हेही वाचा Election Result 2022: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा फैसला, मतमोजणीला सुरुवात )
क्रमवारीतील स्थान
- अष्टपैलू क्रमवारीत दोन स्थानांनी प्रगती
- फलंदाज क्रमवारीत 17 स्थानांची झेप (37 वा)
- गोलंदाजी क्रमवारीत तीन स्थानांची सुधारणा ( 17 वा)