रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. पुणे मेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी व वनाज ते गरवारे हे दोन्ही मार्ग व्यावसायिक तत्त्वावर सुरू झाले आहेत. या मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. परंतु या मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सध्या एका वेगळ्याच गोष्टीचा त्रास होत आहे. मेट्रो स्थानकांजवळ वाहनतळ सुविधा नसल्यामुळे प्रवासी वैयक्तिक वाहने कुठे पार्क करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
( हेही वाचा : Russia-Ukraine War : खाद्यतेलाच्या दरात भरमसाठ वाढ! जाणून घ्या दर )
प्रवाशांची निराशा
पुणे मेट्रो प्रकल्प राबविणाऱ्या महामेट्रोने इतर वाहनांसाठी पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याचे मान्य केल्याने प्रवाशांची निराशा झाली आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करण्यापूर्वी वाहने कुठे उभी करायची हा प्रश्न पुणेकरांसमोर निर्माण झाला आहे. पुणे-मुंबई महामार्गालगत पार्किंगसाठी कमी जागा आहे. जागा मिळाल्यास आम्ही वाहनतळ उभारू असे महामेट्रोचे प्रवक्ते हेमंत सोनवणे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी व वनाज ते गरवारे या दोन्ही मार्गांचे कमीत-कमी तिकीट १० रुपये व जास्तीत जास्त तिकीट २० रुपये आहे. प्रत्येक स्थानकात मेट्रो २० सेकंद व ज्याठिकाणी गर्दी आहे तिथे ३० सेकंद थांबत आहे असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community