मुंबईकरांना उन्हाचे चटके तर, राज्यात ‘या’ भागात पडणार पाऊस

350

मार्च महिना जवळ आला की, मुंबईकरांना हळूहळू उन्हाचे चटके बसण्यास सुरूवात होते. मुंबई शहराचे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान या वर्षातील आजवरचे सर्वोच्च तापमान आहे. एकीकडे मुंबईकरांना उन्हाचे चटके बसत असतानाच दुसरीकडे राज्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईकरांना उन्हाचे चटके

IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेने ६ मार्चला सर्वाधिक ३७.२ तापमान नोंदवले आहे. जे या वर्षातील सर्वाधिक तापमान आहे, तर रात्रीचे किमान तापमान २५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा ४.५ अंश सेल्सिअसने जास्त आहे. येत्या काही दिवसात मुंबईच्या तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईकरांना उन्हाचे चटके बसणार आहेत.

( हेही वाचा : मुंबईकरांना खुल्या बसमधून मिळणार ‘बेस्ट’ दर्शन! )

राज्यातील या भागात पाऊस

भारतीय हवामान विभागाने पुण्यासह संपूर्ण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये गारपीट तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. तर कोकण आणि गोवा सुद्धा काही ठिकाणी पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाकडून जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि नगर जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, धुळे, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.