चंद्रकांत दादा म्हणतायेत, “भाजपला पराभूत करणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटणं”

127

आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ केला असून उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. गोवा आणि उत्तराखंडमध्येही भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे, पाच राज्यांच्या निकालात पंजाब वगळता इतर ठिकाणी कमळ फुलल्याचं चित्र दिसतंय आहे. या निकालासंदर्भात प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

‘एक परिपक्व राजकीय नेता म्हणून मी निकालावर लगेच भाष्य करणं योग्य नाही. पण, सध्या जे चित्र दिसत आहे, त्यावरुन 5 पैकी 4 राज्यांत भाजपचा विजय होईल. युपीत सर्व महिलांना भाजपला मतदान केलं असेल आणि पुरुषांनी समाजवादी पक्षाला. तसेच, भाजपला पराभूत करणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटण्यासारखं आहे,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

(हेही वाचा – Election Result 2022: पंजाबमध्ये ‘आप’च बाप! काँग्रेसला ‘झाडू’न काढले )

काँग्रेसची पिछेहाट तर भाजपची पुन्हा मुसंडी

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश असून सुरुवातीचे कल आता हाती आले असून कोणत्या राज्यात कोणाची सत्ता आहे हे चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. दरम्यान, या निकालात काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली असून भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. पंजाबमध्ये आपने स्पष्ट बहुमत मिळवत काँग्रेसचा दारुण पराभव केला. या निकालानंतर देशभर भाजप समर्थकांनी जल्लोष केला आहे. देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा दणदणीत विजय मिळवल्याचे चित्र दिसून येत आहे. या 5 राज्यांच्या निकालासंदर्भात चंद्रकात पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.