पंजाब निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आपने ९२ जागांवर आघाडी मिळवली असून सत्ताधारी कॉंग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये हा जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच. मात्र, हा बदल कॉंग्रेसला धक्का देणारा आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. पंजाब असं एक राज्य होतं ज्याठिकाणी कॉंग्रेसची सत्ता होती. तिथे आज अतिशय वेगळं चित्र बघायला मिळत आहे असेही शरद पवार म्हणाले.
( हेही वाचा : आजी-माजी मुख्यमंत्र्यांना बसला झटका! ‘या’ उमेदवारांनी केला पराभव )
आम आदमी पक्षाचे यश
‘आम आदमी पक्ष’ हा अलीकडे तयार झालेला राजकीय पक्ष आहे. आपने दिल्लीत गेल्या दोन निवडणुकांमध्ये ज्याप्रकारे यश संपादन केले यामुळे दिल्लीतील सर्वसामान्यांच्या मनात या पक्षाने घर केले आहे. पंजाब हे दिल्लीच्या सीमेवरील राज्य आहे. दिल्लीमध्ये केलेल्या कामांचा परिणाम पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला झाला असेही पवार यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत लोकांनी कौल दिला त्याचा स्वीकार व सन्मान करायला हवा, असेही ते यावेळी म्हणाले.
…तो महाराष्ट्र भी तैयार है
भाजपकडून आता ”अभी महाराष्ट्र बाकी है” असे बोलले जात असल्याचा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी शरद पवारांना केला असता ठिक आहे ”अभी महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है” असा स्पष्ट इशारा पवार यांनी यावेळी देत महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.
Join Our WhatsApp Community