देशातील ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाले, त्यामध्ये ४ राज्यांत भाजप सत्ता मिळवणार हे निश्चित होते. त्याप्रमाणे निकाल लागताच संजय राऊत लक्ष्य बनले आहेत. कारण निवडणुकीआधी संजय राऊत रोज भाजपवर तुटून पडायचे. आजच्या दारून पराभवानंतर संजय राऊतांचा सूर काहीसा मवाळला आहे. अशातच भाजप नेत्यांनी मात्र जुने सूड छेडायला सुरू केले आहे.
जावेद भाई अपना हार्मोनीयम पैक कर लो सलीम भाई को गाना सुनना हैं !
Salim – Javed का साथ हम टूटने नहीं देंगे ! pic.twitter.com/0rM1VIDqf4— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) March 10, 2022
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पियानो वाजवाल होता. तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी हार्मोनियम वाजवला होता. भाजप नेते मोहीत कंबोज यांनी हीच आठवण राऊतांना करून दिली आहे. मोहीत कंबोज यांनी संजय राऊतांचा एक फोटो ट्विट करत, जावेद भाई अपना हार्मोनीयम पैक कर लो सलीम भाई को गाना सुनना हैं, असे ट्विट राऊतांना उद्देशून केले आहे.
(हेही वाचा Uttar Pradesh Election Result 2022: एकाही मुसलमानाला उमेदवारी न देता भाजपाने फडकावला भगवा)
राऊत बनले लक्ष्य
मोहीत कंबोज हे आधीपासूनच नवाब मलिक आणि संजय राऊत यांचा उल्लेख जावेद-सलीम असा करत आहेत. सध्या नवाब मलिक ईडीच्या कोठडीत आहेत. तर आता संजय राऊत यांनी हार्मोनियम पॅक करावे आणि कोठडीत मलिकांना गाणे ऐकवायचे आहे. अशा अर्थाचे ट्विट मोहीत कंबोज यांनी केल्यानंतर हे ट्विट बरेच व्हायरल होत आहे. त्यांनी ज्या प्रकारच्या ‘नोटा’ वापरल्यात त्यापेक्षा कमी मते मिळाली आहेत. विजय पचवायला शिकले पाहिजे, अजीर्ण झाले की त्रास होतो. सुडाने कारभार न करता लोकशाही पद्धतीने राज्य करायला शिकले पाहिजे, असे राऊत म्हणाले. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले असून, भाजप तब्बल दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे गोवा, मणिपूर, उत्तराखंडमध्येही भाजपची आघाडी आहे. भाजपच्या या विजयावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी काँग्रेसचेही कान टोचले आहे.
Join Our WhatsApp Community