भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना जास्तीत-जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. बाहेरगावी जाणा-या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये रेल्वेकडून प्रवाशांना चादर, रग आणि पडदे यांची सुविधा देण्यात येते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या नियमावलीनुसार, रेल्वे गाड्यांमध्ये या सुविधा देण्यावर निर्बंध घालण्यात आले होते.
परंतु गुरुवारी भारतीय रेल्वेकडून हे निर्बंध हटवण्यात आले असून पुन्हा या सुविधा सुरू करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे बाहेरगावी जाणा-या प्रवाशांसाठी ही खूप चांगली बातमी असल्याचे म्हटले जात आहे.
(हेही वाचाः अलर्ट! पाणी जपून वापरा! ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद!)
कोविडमुळे होते निर्बंध
मार्च 2020 पासून कोविड-19 च्या प्रसारामुळे थेट संपर्क येणा-या सर्व वस्तूंवर भारतीय रेल्वेकडून निर्बंध घालण्यात आले होते. कोविड-19 नियमावली अंतर्गत निर्बंध घालत प्रवाशांना करण्यात येणारा चादरी आणि रग यांचा पुरवठा बंद केला होता. पण आता कोविड-19 रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भारतीय रेल्वेकडून या सेवा पुन्हा पुरवण्यात येणार आहेत. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री दर्शना जरदोश यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
आज और अभी से ब्लैंकेट, लिनेन भी मिलेगा और बाक़ी सुविधा भी।
आपकी यात्रा सुखद हो।
यहाँ पढ़ें- https://t.co/ZQlpyYj9TD
— Darshana Jardosh (@DarshanaJardosh) March 10, 2022
(हेही वाचाः ‘या’ अनोख्या उपक्रमातून कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जात आहेत)
रेल्वेने आता तात्काळ प्रभावाने गाड्यांमध्ये चादरी, रग्ज आणि पडद्यांच्या पुरवठ्यासंदर्भात निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे साहित्य कोविड पूर्व कालावधीत जसे पुरवले जायचे, तसेच सध्याच्या काळातही पुरवले जातील असे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community