मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकांवर सौरऊर्जा प्रकल्प सुरू! होणार लाखोंची बचत

144

२०३० पर्यंत मुंबई कार्बनमुक्त करण्याचे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे ध्येय आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि लाखो रुपयांची बचत करण्यासाठी मध्य रेल्वेकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. टिटवाळा, कसारा आणि इगतपुरी रेल्वे स्थानके आणि त्याच्या लगतचा रेल्वे परिसर आता स्वच्छ होणार असून हरित ऊर्जेवर चालणार आहे. टिटवाळा, कसारा आणि इगतपुरी या रेल्वे स्थानकांमध्ये दैनंदिन कामकाजासाठी सौर उर्जेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे.

( हेही वाचा : बाहेरगावी जाणा-यांसाठी चांगली बातमीः बंद केलेली ‘ही’ सेवा रेल्वेने पुन्हा केली सुरू )

लाखो रूपयांची बचत

  • इगतपुरी येथील उपविभागीय रूग्णालयातही रूफ टॉप ग्रिड जोडलेले ५ Kwp सौर पॅनेल कार्यान्वित करण्यात आले. या सौरऊर्जा प्रकल्पाची वार्षिक ऊर्जा निर्मिती ६००० kwh आहे आणि यामुळे अंदाजे ४५ हजार रुपये वार्षिक बचत होणार आहे.
  • इगतपुरी आणि कसारा स्थानकांवर प्रत्येकी ४० Kwp क्षमतेचा रूफ टॉप ग्रिड कनेक्टेड सोलर प्लांट देखील नुकताच कार्यान्वित करण्यात आला. या रूफ टॉप ग्रिड कनेक्टेड सोलर प्लांटची वार्षिक ऊर्जा निर्मिती प्रत्येकी ४८००० kwh आहे यामुळे अंदाजे ७.५ लाखांची वार्षिक बचत होणार आहे.
  • या व्यतिरिक्त, टिटवाळा येथे रूफ टॉप ग्रिड जोडलेले ५ Kwp सौर पॅनेल देखील नुकतेच कार्यान्वित करण्यात आले. या रूफ टॉप ग्रिड कनेक्टेड सोलर प्लांटची वार्षिक ऊर्जा निर्मिती ६,००० kwh आहे. यामुळे अंदाजे ४५ हजार रुपये वार्षिक बचत होणार आहे.

पर्यावरणाचे रक्षण

मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक, कल्याण रेल्वे शाळा, कल्याण रेल्वे रुग्णालय, कुर्ला आणि सानपाडा कारशेड, लोणावळा, खंडाळा, डॉकयार्ड रोड, आसनगाव, रोहा, आपटा, पेण आणि चेंबूर रेल्वे स्थानकांवर वीज निर्मितीसाठी सौर पॅनेल बसवले आहेत. यामुळे लाखो रुपयांची बचत होऊन पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.