बिबट्यांच्या अधिवासासाठी शहराजनीकच बसलेल्या मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबाबत जगभरातील वन्यप्रेमींमध्ये उस्तुकता असते. जगभरात शहरात वसलेल्या या बिबट्यांच्या जंगलात आता उन्हाळ्यापासून बिबट्यांची गणना सुरु होतेय. गेली दोन वर्ष कोरोनामुळे बिबट्यांची गणना झाली नव्हती. परंतु यंदाच्या वर्षी प्रत्येक ऋतुमानात संपूर्ण नॅशनल पार्कमधील बिबट्यांची गणनाप्रक्रिया होईल, अशी माहिती उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक जी मल्लिकार्जून यांनी दिली.
शुक्रवारी वनविभाग आणि वाईल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडियाच्यावतीने बिबट्यांच्या घनतेबाबत माहिती देणारा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला. शहरातील बिबटे – मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि लगतच्या तुंगारेश्वर वन्यजीव अभायरण्य या संरक्षित क्षेत्रातील कहाणी या शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला.
( हेही वाचा : कोकण पट्ट्यातील तापमानात वाढ! )
कधी केले संशोधन
२०१५ साली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तर पुढील वर्षात २०१६ साली तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात राज्य वनविभाग आणि केंद्रीय पर्यावरण खाते, वनविभाग आणि वातावरणीय बदल या केंद्राशी संलग्न असलेल्या भारतीय वन्यजीव संस्था यांनी पूर्ण केला. वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसाय़टी ऑफ इंडिया आणि भारतीय वन्यजीव संस्थेने आणि राज्य वनविभागाने या संशोधनासाठी तंत्र साहाय्य आणि निधी पुरवठा केला.
संशोधनाचे प्रमुख उद्धिष्ट – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्यातील बिबट्यांची घनता आणि भक्ष्यांची घनता तपासणे तसेच बिबट्यांचा आहार समजून घेणे.
संशोधनातील निरीक्षण –
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यानानजीकच्या प्रत्येक चौरस किमीमध्ये २० हजार माणसांची संख्या आहे.
- एका शहरातील संरक्षित जंगलात एखाद्या मोठ्या मांसाहारी प्राण्याची इतकी घनता असणे हे जगभरातील इतर संरक्षित क्षेत्राच्या तुलनेत अतिशय वेगळी बाब आहे.
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांच्या आहारात भटक्या कुत्र्यांचे भक्ष्य हे ३२.१ टक्क्यांपेक्षा जास्त होते. तुंगारेश्वरमधील अभ्यासात बिबट्यांच्या आहारात ६६.७६ टक्के खाद्य कुत्र्यांचे होते.
- वन्यप्राण्याची असो वा पाळीव प्राण्याचे भक्ष्य असो, बिबट्यांची घनता ही त्यांच्या खाद्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. तुंगारेश्वरच्या तुलनेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची घनता जास्त आहे.
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्य या दोन्ही संरक्षित क्षेत्रात बिबट्यांची घनता, कुत्र्यांची घनता, वन्य भक्ष्यांची तसेच बिबट्याच्या आहारातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण यातील फरक का आहे, याचा अद्यापही उलगडा झालेला नाही.
तुंगारेश्वरला इतर वन्यप्राण्यांचा वावर कमी
बिबट्यांना तुंगारेश्वर अभयारण्यात भक्ष्य म्हणून इतर वन्यप्राणी फारच कमी उपलब्ध आहे. त्यामुळे तुंगारेश्वरमधील बिबट्यांच्या खाद्यात प्रामुख्याने कुत्र्यांचा समावेश जास्त आहे, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्यात या सर्व्हेक्षणात सहभागी वाइल्डलाइफ कॉन्झर्वेश सोसायटी ऑफ इंडियाचे साहाय्यक संशोधक निकीत सुर्वे यांनी दिली. सुर्वे हे दोन्ही संरक्षित क्षेत्रातील बिबट्यांच्या गणनेचाही अभ्यास करतात. ही गणना कॅमेरा ट्रेपच्या मदतीने केली जाते.
बिबट्यांच्या गणनेचा याआगोदरचा अहवाल
२०१५, २०१७ आणि २०१८ साली बिबट्यांची गणना झाली आहे. त्यापैकी २०१५ आणि २०१७ साली दिसून आलेले २१ बिबटे बेपत्ता असल्याची माहिती २०१८ च्या गणना अहवालात मिळाली होती. निकीत सुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१८ साली उद्यानात २७ नवे बिबटे आढळून आले. तुंगारेश्वरमध्ये त्यातुलनेत ३-४ पटीने बिबट्यांची संख्या कमी आहे.
यंदाची बिबट्याची गणना कशी होणार
यंदा चौथ्यांदा बिबट्यांची गणना केली जाईल. या गणनेची सुरुवात मे महिन्यापासून होईल. प्रत्येक ऋतुमानात संपूर्ण उद्यान दोन भागांत विभागून कॅमेरा ट्रेपच्या मदतीने बिबट्यांच्या शरीरावरील ठिपक्यांची नोंद घेत गणना केली जाईल.
Join Our WhatsApp Community