राज्यात कोरोना रुग्णांची संख्या खालावली… वाचा आजचा अहवाल

187

राज्यात आता केवळ २ हजार ९६३ कोरोनाचे रुग्ण नोंदवले गेले. रुग्णांची संख्या तीन हजारांच्या खाली आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मात्र गुरुवारी नव्या कोरोना रुग्णांची नोंद ४५२ पर्यंत पोहोचली.

( हेही वाचा : बाहेरगावी जाणा-यांसाठी चांगली बातमीः बंद केलेली ‘ही’ सेवा रेल्वेने पुन्हा केली सुरू )

आरोग्य विभागाची माहिती 

गुरुवारच्या नोंदीत पुण्यातील कोरोना संख्या ब-यापैकी नियंत्रणात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुण्यात आता १ हजार १९२ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत आता ४०५ , ठाण्यात २५४, रायगडमध्ये ७३, नाशकात १७५, अहमदनगरमध्ये २३० आणि नागपूरात कोरोनाचे १०५ रुग्ण उरल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

गुरुवारी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या – ४
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९८.०९ टक्के
राज्यातील मृत्यूदर – १.८२ टक्के
राज्यातील घरात विलगीकरणात असलेल्यांची संख्या – २२ हजार २३५
राज्यात संस्थात्मक विलगीकरणात असलेल्यांची संख्या – ५९९
राज्यात आतापर्यंत दिसून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या – ७८ लाख ७० हजार ३०९
राज्यात कोरोना उपचारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या – ७७ लाख १९ हजार ५९४

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.