संपूर्ण महाराष्ट्रासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचं अधिवेशन उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सादर होणार आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात आज सन २०२१-२२ या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. यानंतर आज अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. सन २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवालातून राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आश्वासक चित्र समोर आल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. दुपारी २ वाजता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष २०२२-२३ वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
अर्थसंकल्पातून राज्याला काय मिळणार?
दरम्यान, ३ मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. ३ मार्च ते २५ मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, ११ मार्चला म्हणजेच, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अशातच अधिवेशनात अनेक मुद्दे गाजले आहेत. अनेक मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. अशातच आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून राज्याला काय मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(हेही वाचा – राज्यपालांकडे भाजप करणार सत्ता स्थापनेचा दावा!)
स्थूल राज्य उत्पन्नात ४.४ टक्के वाढ अपेक्षित
मिळालेल्या माहितीनुसार, अर्थिक पाहणी अहवाल २०२१-२२ विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. या अहवालानुसार, राज्याच्या आर्थिक वाढीचा दर १२.१ टक्के राहील, असा अदांज वर्तवण्यात आला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्के वाढ अपेक्षित आहे. आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार, २०२१-२२ मध्ये राज्यातील उद्योग क्षेत्रात ११.९ टक्के वाढ झाली आहे. तर सेवा क्षेत्रात १३.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच या अहवालात कृषि संलग्न कार्य क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नात ४.४ टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तर पीक क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धी ३.० टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community