आता रेल्वे स्थानकावरच होणार प्रवाशांचा थकवा दूर, वाचा मध्य रेल्वेची अनोखी सुविधा!

148

मध्य रेल्वेने मागच्या काही दिवसांमध्ये आपल्या प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. आता नुकतचं प्रवाशांच्या करमणुकीसाठी लोकलमध्ये ‘कंटेंट ऑन डिमांड’ अंतर्गत वायफाय आणि मोबाईल अॅपची सुविधा देण्यात आली होती. आता मध्य रेल्वे प्रवाशांचा थकवा दूर करण्यासाठी सीएसएमटी आणि एलटीटी या स्थानकांवर दोन ते तीन महिन्यांत सलून उभे करणार आहे.

प्रथमच ही सुविधा 

रेल्वेस्थानकांवरील मोकळ्या जागेचा वापर प्रवाशांच्या दैनंदिन आयुष्यातील गरजा भागवण्यासाठी सलून उभारण्याचा उपक्रम मध्य रेल्वेने हाती घेतला आहे. लोकल आणि स्थानकातील प्रवासी वर्दळीला सलूनची अडचण होणार नाही, अशा रीतीने मध्य रेल्वे त्याची उभारणी करणार आहे. रेल्वेद्वारे महसूल वाढीसाठी हे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. सीएसएमटीवर प्रवाशांच्या रहदारीच्या ठिकाणी पर्सनल केअर सेंटर डिझाईन केले जाणार आहे. सीएसएमटी स्थानकात दोन ते तीन महिन्यांत अशी सुविधा सुरु होईल. त्यानंतर एलटीटी स्थानकातही ही सुविधा देण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर प्रथमच ही सुविधा प्रवाशांना देण्यात आली आहे.

( हेही वाचा :‘इतक्या’ खत विक्री केंद्र धारकांचे परवाने निलंबित हे आहे कारण! )

अमर्याद वापरता येणार

याआधी मध्यरेल्वेकडून कंटेंट ऑन डिमांड’ अंतर्गत वायफाय आणि मोबाईल अॅपची सुविधा देण्यात येणार आहे. या वायफायद्वारे अॅप डाऊनलोड करून त्यातील करमणुकीचे विविध कार्यक्रम प्रवाशांना पाहता येतील. हे वायफाय प्रवाशांना अमर्याद वापरता येणार आहे. यात आवडीचे चित्रपट, गाणी, मालिका, क्रिकेट सामने पाहण्यासाठी लोकलच्या डब्यात मोबाईलमधील इंटरनेटची गरज भासणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.