“हार-जीत होत राहते, आम्हीही तुमच्या आनंदात सामील आहोत”

129

विधानसभा निवडणुकीत चार राज्यात भाजपचा दणक्यात विजय झाला असला तरी पंजाबमध्ये विजय मिळवता आला नाही. पंजाबमध्ये आम आदमी पक्षामुळे काँग्रेससह भाजपचे चांगलेच धाबे दणाणले तर दुसरीकडे शिवसेनेला उत्तर प्रदेश आणि गोव्यात अपेक्षित यश मिळाले नसल्याने भाजपा नेत्यांनी सेनेवर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, हार-जीत होत राहते, आम्हीही तुमच्या आनंदात सामील आहोत.

काय म्हणाले राऊत?

पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले असले तरी भाजपच्या यशात मायावतींचे योगदान आहे, तसेच पंजाबच्या जनतेनी भारतीय जनता पार्टीला अत्यंत वाईट पद्धतीने नाकारले आहे. पंजाबमधील पराभावावर मार्गदर्शन करा. तसेच लोकशाहीत विजय-पराभव होत असतो. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडमध्ये भाजपाचा विजय झाल्याचे आम्हाला दु:ख होण्याचे कारण नाही. तुमच्या आनंदात आम्हीदेखील सहभागी आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – अभी तो असली लढाई मुंबई में होगी! फडणवीसांचा नारा)

राऊतांचं भाजपाला आव्हान

उत्तर प्रदेश किंवा या चार राज्यांच्या निवडणुकांचा मुंबई महापालिका निवडणुकीशी काहीही संबंध नाही. गेली 50 वर्ष आम्ही महापालिका लढतोय आणि या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पालिकेवर कायम राहील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यूपी तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, अशा घोषणा भाजपकडून दिल्या जात आहेत. त्याबाबतही राऊत यांना विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वीही महाराष्ट्र बाकी है असे म्हणत होते. काल पवारांनी सांगितले हम तयार है. त्यामुळे काय करणार आहात अजून? आणखी धाडी माराल? धमक्या आम्हाला माहीत आहे. तुम्हाला जे करायचं ते करा. आम्ही तयार आहोत, असे आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.