पांचट,पचपचीत आणि प्रतिगामी अर्थसंकल्प!

169

राज्य सरकारने शुक्रवारी मांडलेला अर्थसंकल्प हा पंचसूत्रीचा विकासाच्या आधारावर नसून, तो मांडल्यानंतर लक्षात येते की, पांचट,पचपचीत आणि प्रतिगामी असा अर्थसंकल्प आहे. हा स्व-राज्याचा अर्थसंकल्प वाटत नसून, स्व-हिताचा अर्थसंकल्प आहे. आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही खूप काही केलं,असं सांगितले गेले पण प्रत्यक्षामध्ये आर्थिक पाहणी अहवालात बघितलं ही कोरोना काळामध्ये शेतकरी खासगी सावकाराकडे वळला हे दिसून आले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चकार शब्दसुद्धा या अर्थसंकल्पात काढला नाही.

मुंबईला मात्र उणे

अर्थसंकल्प राज्याचा पण जिल्हा नियोजनाच्या निधीवर डल्ला मारल्याचा दिसत आहे. अर्थसंकल्प पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे अशा पद्धतीचा आहे. पुणे जिल्ह्यामधील सगळ्या प्रकल्पांना निधी दिला आणि मुंबईला मात्र भोपळा असे चित्र आहे.  कुणाच्या विरोधात आम्ही नाही, पण पुणे जिल्ह्यामध्ये जर मेट्रोच्या विकासाची गती वाढवली जाते, तर मुंबईतल्या मेट्रो कारशेडचे काय ?याबाबत काहीच बोलले जात नाही.

( हेही वाचा: सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प! )

म्हणून हा स्व हिताचा विचार करणारा अर्थसंकल्प

इंद्रायणी मेडिकल सीटी बनवण्याची घोषणा केली. 300 एकर जागेत उभी केली जाणार आहे. पुण्यामध्ये जागा बघून मेडिकल सीटी आणली जातेय की पुण्यासाठी मेडिकल सिटी आणली जातेय? याच्यावरसुद्धा मनात शंका निर्माण होते. या पद्धतीचे चित्र आहे. म्हणून एकंदरीतच बघितलं, तर इतर मागासवर्गीय आयोगालासुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केलं आहे. निधीची तरतूद दिसतच नाही, म्हणून हा अर्थसंकल्प स्वराज्यापेक्षा स्व -हिताचा विचार करणारा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.