स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम १२ मार्च २०२१ पासून सुरु झाला असून या कार्यक्रमाच्या आयोजनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. याचे औचित्य साधून ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव दर्शवणारा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ध्वनीप्रकाश कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये गेट वे ऑफ इंडियाची वास्तू उजळून निघणार आहे.
५०० कोटीची तरतूद
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आयोजनात महाराष्ट्र आघाडीवर असल्याने त्यासाठी ५०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया वास्तूवर महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव दर्शवणारा ध्वनीप्रकाश कार्यक्रम करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत असतील, अशी घोषणा राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
(हेही वाचा गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत मराठी भाषा भवनाची पायाभरणी)
मासिक उत्पन्नाची मर्यादा १० वरून ३० हजारांवर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्य सरकारने स्वातंत्र्य सैनिकांना निवासी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मासिक उत्पन्नाची १० हजार रुपयांची मर्यादा ३० हजार रुपये केली आहे.
Join Our WhatsApp Community