शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीतील गोकुळपुरी भागात भीषण आग लागल्याची मोठी लागल्याची माहिती मिळतेय. आग लागताच या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आगीत 30 झोपड्या जळून खाक झाल्या असून सात जणांचा मृत्यू झाला. परंतु, या आगीचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
Seven people died in a fire that broke out in the shanties of Gokulpuri area last night. The fire was brought under control, seven bodies recovered by the Fire Department: Delhi Fire Service
— ANI (@ANI) March 12, 2022
दिल्लीचे मुख्यमंत्री पीडितांची भेट घेणार
ही घटना दिल्लीतील गोकुळपुरी मधील 12 क्रमांकाच्या खांबाच्या आसपासच्या परिसरातील असल्याची माहिती आहे. शुक्रवारी रात्री भीषण आग लागल्याचं समोर आले आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगीच्या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून, आपण स्वत: घटनास्थळी जाऊन पीडितांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
सुबह सुबह ये दुःखद समाचार सुनने को मिला। मैं स्वयं वहाँ जाकर पीड़ित लोगों से मिलूँगा। https://t.co/rcsN6yIse6
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 12, 2022
अग्नितांडवात मोठ्या प्रमाणात वित्तहानी
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अनेक तासांच्या प्रयत्नांनतर आग आटोक्यात आणण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आले. यामध्ये सात जणांनी जीव गमावला असून 30 झोपड्या जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
Join Our WhatsApp Community