मलायका म्हणतेय, मला ‘ही’ कॉम्प्लिटमेंट जास्त आवडते

123

वयाच्या पन्नाशीतही पंचविशीतल्या तरुणीला लाजवेल इतकी हॉट आणि आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या अर्जुन कपूरबरोबरच्या अफेअरमुळे चर्चेत बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा. मलायका तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत येते. वयाच्या ५० व्या वर्षातही तिचा फिटनेस पाहून अनेक जण थक्क होतात. विशेष म्हणजे एका मुलाची आई असूनही ती फिट आणि ग्लॅमरस असल्यामुळे अनेकदा तिला सेक्सी वा हॉट अशी कॉम्प्लिमेंट नेटकरी देतात. या कमेंटवर आता तिने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली मलायका अरोरा?

अलिकडेच मलायकाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ट्रोलिंग, कमेंट्स यावर तिचं मत मांडलं. ‘गेल्या कित्येक वर्षांपासून बी टाऊनमधील सर्वात सेक्सी महिला हा टॅग तुझ्याकडे आहे याविषयी काय सांगशील?’ असा प्रश्न मलायकाला विचारण्यात आला. त्यावर ‘खरोखरच हा किताब मी घट्ट धरून ठेवला आहे. मी इतक्या लवकर तो जाऊ देणार नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याला एखादी उपाधी, मुकुट किंवा काही तरी बहाल करता तेव्हा ते त्याच्याकडे कायमस्वरूपी राहतं. म्हणून मीही हा किताब कायम माझ्याकडेच राहील असा प्रयत्न करणार आहे. मी नेहमी असं म्हणते, की निस्तेज आणि थंड म्हणून ओळखलं जाण्यापेक्षा सेक्सी, हॉट म्हणून ओळखलं जाणं मला आवडतं. मी नेहमीच या नावानेच ओळखली जाते. मी स्वभावाने खूप चंचल आहे. मला नेहमी सेक्सी म्हणूनच ओळखलं गेलं आहे. म्हणून मला त्या नावाप्रमाणेच जगलं पाहिजे असं मला वाटत नाही. माझा फिटनेस ही माझी आवड आहे. माझ्या आयुष्याचा तो एक भाग आहे. मी जाणूनबुजून, ओढूनताणून केलेली ही गोष्ट नाही,’ असं मलायका म्हणाली.

(हेही वाचा – तुमची ब्रेस्ट साईज काय? अभिनेत्रीने शेअर केला धक्कादायक किस्सा)

पुढे ती म्हणते, ‘तुम्हाला एक नाव दिलं आहे म्हणून तुम्ही कायम तसंच दिसलं पाहिजे असं नाही. महिन्यातले सर्व म्हणजे 30 दिवस मी सेक्सीच दिसते किंवा मला तसंच दिसावं असं वाटत नाही. खरं तर, महिन्याचे 15 दिवस मी या बाबतीत अगदी शिखरावर असते; पण महिन्याचे इतर 15 दिवस मी संघर्ष करत असते. कारण त्या 15 दिवसात सर्व स्त्रिया काही हॉर्मोनल चेंजेसमधून जात असतात. त्या 15 दिवसांत मलाही संघर्ष करावा लागतो,’ असं ती म्हणते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.