बिग बॉसनंतर विशाल सोनाली पुन्हा एकत्र! पहा व्हिडिओ…

132

बिग बॉस मराठीचं तिसरे पर्व संपून आता बरेच दिवस झाले. मात्र, तरीदेखील या पर्वात सहभागी झालेल्या स्पर्धकांविषयी सोशल मिडियावर चर्चा रंगते. बिग बॉसच्या घरात असताना विशाल निकम आणि सोनाली पाटील या जोडीची जोरदार चर्चा रंगली होती. इतकंच नाही तर ते एकमेकांच्या प्रेमात होते असंही म्हटलं जात होतं. मात्र, आमच्यात केवळ मैत्रीचं नातं आहे हे दोघांनीही जाहीरपणे सांगितल आहे. विशेष म्हणजे बिग बॉस संपल्यानंतरही या दोघांमधील मैत्री कायम आहे. अलिकडेच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

( हेही वाचा : ‘मेटामॉर्फोसिस’ ट्रान्सजेंडर डॉक्युमेंटरी मावा फेस्टिव्हलमध्ये प्रस्तुत! )

चाहत्यांना आनंद

कलर्स मराठी पुरस्कार सोहळा पार पडला यामध्ये कलर्स वाहिनीवरील सर्व कलाकार उपस्थित होते. यामध्ये या पुरस्कार सोहळ्यासाठी बिग बॉस मराठीचे स्पर्धक पुन्हा एकत्र आले होते. यावेळी बिग बॉग टीमचे रियुनिअन पाहायला मिळाले. विशेष म्हणजे यावेळी विशाल आणि सोनालीला पुन्हा एकत्र पाहून सर्वांनाच चाहत्यांना आनंद झाला आहे. यात विशाल आणि सोनालीचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

या व्हिडीओमध्ये विशाल, सोनाली, विकास आणि मीनल ही चौकडी पाहायला मिळत आहे. परंतु या व्हिडिओमध्ये विशाल आणि सोनाली काही तरी चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे मीनल आणि विकासची माजमस्ती सुरु आहे. विशाल सोनाली यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.