भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजवर विजय मिळवत घेतली झेप!

154

आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. भारतीय महिला संघाने 155 धावांनी वेस्ट इंडिज महिला संघावर विजय मिळवला. या विजयामुळे भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. चार गुणांसह भारताने पाचव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. आठ देशांमध्ये ही स्पर्धा होत असून वेस्ट इंडिजवर विजय मिळवून भारत गुणतालिकेत अव्वल स्थानी आला आहे.

( हेही वाचा : धक्कादायक! पुण्यातील शाळेत महिला बाऊन्सरकडून पालकांना मारहाण )

हरमनप्रीत स्मृतीचे शतक

हा सामना हॅमिल्टन सेडन पार्क येथे खेळण्यात आला. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकात 8 विकेट्स गमावून वेस्ट इंडिजला 318 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, वेस्ट इंडिज महिला संघाला हे लक्ष्य पूर्ण करण्यात अपयश आले. वेस्ट इंडिजने 40.3 षटकांत 162 धावा केल्या. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना या सामन्याच्या शिल्पकार ठरल्या. हरमनप्रीतने 107 बॉल्समध्ये 109 धावा केल्या. तर, मानधनाने 119 बॉलमध्ये 123 धावा केल्या. यामध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 184 धावांची विक्रमी भागीदारी केली. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर या दोघांनीही शतके झळकावली.

अनुभवी कर्णधार 

कर्णधार म्हणून मिताली राज सर्वाधिक सामने खेळणारी खेडाळू ठरली आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्कच्या नावावर होता. मितालीने राजने कर्णधार म्हणून आजवर २३ सामने खेळले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.