आमदाराने चिरडले २२ जणांना, संतप्त जमावाने चोपले

150

ओडिशा राज्यातील चिलिका येथील बिजू जनता दलचे आमदार प्रशांत जगदेव यांच्या कारने भाजपच्या २२ कार्यकर्त्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. हा अपघात ओडिशामधील खुर्दा जिल्ह्यात शनिवारी दुपारी घडला, त्यामध्ये ७ पोलिसांचा समावेश आहे. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या घटनेनंतर संतप्त जमावाने आमदाराला मारहाण केली. यामध्ये आमदारही जखमी झाला आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत.

आमदार जगदेवांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल

खुरदा जिल्ह्यातील बाणापूर येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाहेर ब्लॉक अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे काही समर्थक कार्यालयाच्या बाहेर जमले होते. यावेळी चिलिका येथील आमदार प्रशांत जगदेव यांच्या वाहनाने जमलेल्या लोकांना चिरडले. त्यानंतर संतप्त जमावाने आमदार जगदेव यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केली. प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगवले. सध्या जखमी लोकांना तसेच आमदार जगदेव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती एसपी आलेखचंद्र पाधी यांनी दिली.

(हेही वाचा मुंबई पोलीस आयुक्तांची सीबीआय चौकशी! महाविकास आघाडीला धक्का)

आमदार जगदेवांना अटक करण्याची मागणी

दरम्यान, प्रशांत जगदेव यांची बिजू जनता दलातून मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात हकालपट्टी करण्यात आली होती. त्याचबरोबर जगदेव यांना जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षपदावरूनदेखील हटवण्यात आले होते. मात्र या घटनेनंतर ओडिशा राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज हरिशचंद्र यांनी आमदार जगदेव यांना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.