‘मविआ’ची माघार! पोलीस फडणवीसांच्या घरात येणार

133

पोलीस बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी नोटीस पाठवली असून, त्यांना रविवारी बीकेसीमधील सायबर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. फडणवीसांनी स्वत: याबाबत पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली होती. तसेच, निश्चितपणे मी उद्या ११ वाजता बीकेसीमधील सायबर पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले होते. दरम्यान आता पोलीस स्वत: घरी येऊन माहिती घेणार असल्याने फडणवीस यांना पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता नाही.

फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, या पोलीस बदली घोटाळ्याच्या तपासात योग्य ते उत्तर देऊ. त्याचवेळी मला याबाबत माहिती कशी मिळाली, कुठून मिळाली, याचे स्रोत सांगणे बंधनकारक नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मला विशेषाधिकार आहेत, असेही ते म्हणाले.

( हेही वाचा : मुंबई महापालिकेत सत्तापालट…सन १९८४-८५ची पुनरावृत्ती होणार? )

फडणवीसांनी केले ट्वीट

यानंतर फडणवीसांनी ट्वीट केले यात ते म्हणाले की, सहपोलिस आयुक्तांचा मला दूरध्वनी आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र ! असे फडणवीस यांनी ट्वीट केले आहे.

दरम्यान फडणवीस यांना सायबर पोलिसांनी बजावलेल्या नोटिसमुळे भाजपा आक्रमक झाली आहे. फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजपाचे कार्यकर्ते बीकेसी परिसरात एकवटणार असून शक्तीप्रदर्शन करतील, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.