राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात कायमंच आक्रमक विधाने करणारे राणे पुत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या आक्रमक विधानामुळे आता निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावर आता निलेश राणे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी मला शरद पवार यांच्यावर संशय आणि तो राहणार, असे आक्रमक ट्वीट करत निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचाः राणे बंधू ‘त्या’ वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत, गुन्हा दाखल!)
काय आहे ट्वीट?
माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले, कितीही केसेस घातल्या तरी मी म्हणतच राहणार, मला संशय आहे आणि राहणारच की पवार साहेब दाऊदची व्यक्ती आहेत, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होऊन सुद्धा निलेश राणे यांनी पवारांबाबत केलेल्या ट्वीटमुळे आता त्यांच्या अडचणी अजून वाढणार का, अशी चर्चा होऊ लागली आहे.
कितीही माझ्यावर केसेस घातले तरी मी म्हणतच राहणार, मला संशय आहे आणि राहणारच की पवार साहेब दाऊदची व्यक्ती आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 13, 2022
राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी नितेश आणि निलेश राणे यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राणे बंधुंनी जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. तसेच शरद पवार यांचे दाऊदसोबत थेट संबंध असल्याचं वक्तव्य करुन त्यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असे या तक्रारीत चव्हाण यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः अशी पद्धत महाराष्ट्रात नव्हती, अजित पवारांचा सरकारला घरचा आहेर!)
काय म्हणाले होते राणे?
भाजप नेते निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार हे महराष्ट्रात दाऊदचा माणूस असल्याचे म्हणत संशय व्यक्त केला होता. नवाब मलिकांचा राजीनामा घेतला तर ते खरं बोलतील आणि पवारांविषयी माहिती बाहेर येईल, असं वाटून मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही का, अशी शंकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली होती.
Join Our WhatsApp Community