शिवसेना खासदार संजय राऊत हे आपल्या विधानांमुळे कायमंच चर्चेत असतात. रोज सकाळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते विरोधकांवर जोरदार आगपखड करतात. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर त्यांनी केलेल्या एका वक्तव्याला राज ठाकरेंनी दिलेल्या उत्तरावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
राज ठाकरेंच्या त्या विधानाचा अर्थ नेमका काय आहे, अशा चर्चा आता चांगल्याच रंगल्या आहेत. संजय राऊत यांना तुरुंगात जावं लागणार का, अशाही चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
(हेही वाचाः मंत्र्यांनी गांधींऐवजी दाऊदच्या फोटोपुढे नतमस्तक व्हावं! राणेंचा ठाकरे सरकारवर घणाघात)
त्यांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी
मनसेच्या वर्धापन दिनी पुणे येथे झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची नक्कल केली. त्यावर आमचे राज्य हे मिमिक्रीवर चालत नाही, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला. राऊतांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. राज ठाकरेंच्या या विधानावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता राऊतांना तुरुंगात जावं लागणार का, अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.
संदीप देशपांडे यांचंही सूचक ट्वीट
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या ट्वीटवरुन सुद्धा चर्चा रंगली आहे. जेलमध्ये गेल्यावर काही लोक घरचं जेवण मागतात, काहींना पुस्तकं लागतात, काहींना औषध लागतात, यापुढे काही लोक जेलमध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील, असे सूचक ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे. यामुळे आता या सगळ्याचा नेमका अर्थ शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
(हेही वाचाः कितीही गुन्हे दाखल केले तरी, ‘पवार साहेब हे…’ राणेंच्या ट्वीटमुळे पुन्हा खळबळ)
Join Our WhatsApp Communityजेल मध्ये गेल्यावर काही लोक घरच जेवण मागतात काहीना पुस्तक लागतात, काहीना औषध लागतात, या पुढे काही लोक जेल मध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 13, 2022