‘अशी’ दिली जातेय विद्यार्थ्यांना उत्तम आहाराची शिकवण!

165

आपल्या आहारानुसार आपले शरीर घडते. त्यामुळे आहारात प्रथिने, कार्बोहायड्रेटस यांचा समतोल असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि खेळाचा समतोल साधावा. तसेच, जे काही क्षेत्र निवडाल त्याची मनापासून तयारी करा. विद्यार्थ्यांनी जंकफूड टाळून फळे आणि भाजीपाला यांचा आहारात समावेश करावा, असे ऑलिम्पिक खेळाडू माना पटेल हिने संतुलित आहाराचे महत्त्व विशद करताना सांगितले. मुलांना उत्तम आहाराचं महत्त्व समजावं म्हणून मीट द चॅम्पियन्स’ च्या या उपक्रमाच्या आधारे आहाराचे महत्त्व सांगितले जाते.

म्हणून सुरु करण्यात आला उपक्रम

माना पटेल हिने शनिवारी गोव्यातील डॉ के. बी. हेडगेवार शाळेला भेट दिली आणि राज्यातील 75 शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या उपक्रमात 300 विद्यार्थी सहभागी झाले होते. माना पटेल हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसाठी संतुलित आहार आणि शारिरीक तंदुरुस्तीसाठी विशद केलेल्या विशेष उपक्रमांतर्गत ‘मीट द चॅम्पियन्स’ ची गोव्यात सुरुवात केली. माना पटेल ही नुकत्याच संपन्न झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जलतरणाच्या 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारासाठी पात्र ठरलेली पहिली महिला आहे. ‘मीट द चॅम्पियन्स’ उपक्रमाचा आरंभ टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने डिसेंबर 2021 मध्ये केला.

( हेही वाचा :धक्कादायक! पोलिसाने स्वत:वर गोळी झाडत केली आत्महत्या )

संयुक्तरित्या या उपक्रमाचे आयोजन

आतापर्यंत या उपक्रमांतर्गत बजरंग पुनीया, पॅरालिम्पिक पदकविजेते मरियप्पन थंगवेलू, योगेश कथुनिया यांनी शाळांना भेटी देऊन, विद्यार्थ्यांमध्ये खेळांप्रती रुची निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तरित्या या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारताच्या प्रचंड यशानंतर जेव्हा पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी संवाद साधत, त्यांना 75 शाळांना भेट देण्याची आणि संतुलित आहार आणि तंदुरुस्तीचे महत्त्व सांगण्याची विनंती केली होती, त्यानंतर हा उपक्रम सुरू करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.