नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. पक्षाच्या या दारुण पराभवाची कारणे शोधण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची सभा रविवारी पार पडली. या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीवर विचारमंथन करण्यात आले. या बैठकीत राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली असल्याचे समजते. त्यामुळे सध्याच्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या मागणीचा सकारात्मक विचार करतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राहुल गांधींना अध्यक्ष करण्याची मागणी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या कार्यकारिणीची ही बैठक रविवारी पार पडली. त्यावेळी काँग्रेसच्या काही नेते व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद द्या, अशी मागणी केल्याचे समजत आहे. पक्षाच्या मुख्यालयाजवळ राहुल गांधींच्या अध्यक्षपदी नियुक्तीच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षांच्या भूमिकेत पहायचे आहे, असेही मत यावेळी काही नेत्यांनी व्यक्त केले.
कांग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी की अध्यक्षता में कांग्रेस कार्यसमिति की बैठक pic.twitter.com/6J13RUHLHC
— Congress (@INCIndia) March 13, 2022
(हेही वाचाः ‘घोटाळे कराल तर…’ केजरीवालांचा मंत्री-आमदारांना धमकीवजा इशारा)
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनीही दिला दुजोरा
बैठकीपूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही राहुल गांधींच्या अध्यक्ष पदाला दुजोरा दिल्याचे समजते. निवडणुकीत पराभव आणि विजय होत असतात. आज देशात सत्तेत असलेल्या भाजपला एकेकाळी केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाले तर पक्ष एकसंध राहील, असे मत अशोक गहलोत यांनी यावेळी व्यक्त केले.
Join Our WhatsApp Community