भयंकर! पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना वाटेतच मृत्यूनं गाठलं अन्…

121

एकादशीनिमित्त पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांवर अर्ध्या वाटेतच काळाने घाला घातला आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावजवळ एक भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरात वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ पुरुष आणि १ महिलेचा समावेश आहे.

अशी घडली घटना

सोलापूरमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात घडला असून मालट्रकने वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ६ जण जखमी झाले असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरमध्ये एकूण २२ प्रवासी होते. अपघातातील सर्व वारकरी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावचे रहिवाशी आहेत. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी जवळ हा अपघात झाला आहे. तुकाराम सुदाम शिंदे (वय १३), ज्ञानेश्वर दत्तात्रय साळुंखे (वय १४ ), भागाबाई जरासंद मिसाळ (वय ६०) आणि जरासंद माधव मिसाळ (वय ७०) असे या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

(हेही वाचा – कोकणातील ‘शिमगा’ म्हणजे महाराष्ट्राचे भूषण !)

या घटनेनंतर या भीषण अपघाताला कारणीभूत असलेल्या व्यक्ती विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाकडून केली जात आहे. तर अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. अपघात स्थळावरुन जखमींना तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. तसेच, सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.