“देशात आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय पण…”

98

आरक्षण संपवण्याचा घाट देशात घातला जात आहे. त्यामुळे सर्व मागसवर्गीयांनी एक होण्याची ही वेळ आहे. सर्वांनी एकत्र येत एक लढा उभारण्याची गरज आहे, आम्ही ओबीसींसाठी लढा उभा केला आहे तुम्ही आमच्या ओबीसी लढ्यात सामील व्हा एकजूट झाली तरच याबाबतीतला न्याय आपल्याला मिळेल, असा विश्वास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

राज्य शासन आपल्यासोबत आहे

इचलकरंजी येथे राष्ट्रीय विणकर सेवा संघातर्फे घेण्यात आलेल्या विणकर महाधिवेशनला मंत्री छगन भुजबळ यांनी संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, राज्यातले महाविकास आघाडी सरकार तुमच्यासोबत आहे. विणकर समाजाच्या प्रश्नाबद्दल राज्यातले सरकार सकारात्मक आहे. विणकरांच्या प्रश्नांसाठी लवकरच शासनाकडे संबंधित मंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन विणकारांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. राज्य शासन आपल्यासोबत आहे.

(हेही वाचा – सोनिया गांधी म्हणाल्या, …तर मी, राहुल आणि प्रियांकाही राजीनामा देऊ! )

इचलकरंजी येथे पार पडलेल्या विणकर महाधिवेशनाला भुजबळ यांच्यासह माजी खासदार राजू शेट्टी, जगद्गुरू बसवराज पट्टाचार्य स्वामी, आ. प्रकाश आवाडे, कालाप्पा आवाडे, प्रकाश शेंडगे, राजीव आवळे, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, वीज तज्ञ प्रताप होगाडे, समता परिषदेचे दादासाहेब चोपडे आणि राष्ट्रीय विणकर सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.