युक्रेन-रशिया युद्धामुळे मायदेशी परतलेल्या 13 विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचे काय, हा प्रश्न पुढे आला असतानाच संबंधित विद्यापीठाने यावर मार्ग काढला आहे. 14 मार्चपासून काही विद्यापीठांचे ऑनलाईन क्लास सुरू होत आहेत. लवकरच प्रॅक्टिकलचाही मार्ग निघेल. याशिवाय नजीकच्या पोलंड, जाॅर्जिया, अर्मेनिया, हंगेरी, किरगिजस्तान, कजाकीस्तान आदी देशांत प्रवेश घेता येणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या तुलनेत युक्रेनमधील शिक्षण स्वस्तात असल्याने 13 विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील चार विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे. या दरम्यान फेब्रुवारीपासून युक्रेन व रशिया या दोन देशांदरम्यान युद्ध सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांना भारतात परतावे लागले.
(हेही वाचा – सोनिया गांधी म्हणाल्या, …तर मी, राहुल आणि प्रियांकाही राजीनामा देऊ! )
विद्यापीठाच्या सूचनेने दिलासा
युक्रेनमधील युद्धस्थिती कधी निवळेल, हे अनिश्चित आहे. अशा परिस्थितीत झाप्रोशिया, व्हिनितसिया या विद्यापीठाने विद्यार्थ्यांना मेल करून पुढील शिक्षण 14 मार्चपासून ऑनलाईन क्लासद्वारे होत असल्याचे सांगितल्याने दिलासा मिळाला आहे.
सातत्याने ढासळत असलेले शेअर बाजार सावरतंय
गेल्या आठवड्यात रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजार सातत्याने ढासळत असलेले पाहायला मिळाले होते. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ढासळत असलेला शेअर बाजार आता सावरत आहे. मंगळवार ते शुक्रवार सलग चार दिवस शेअर बाजार सातत्याने वधारला. आजचा दिवसही शेअर बाजार स्थिर पातळीवर सुरु झाला. सेन्सेक्स 64.1अंकांच्या म्हणजेच वाढीसह 55614.40 वर सुरु झाला. तर निफ्टी 3.25 अंकांच्या वाढीसह16,633.70 वर सुरु झाला.
Join Our WhatsApp Community