मुंबई बुडणार? सरकारने उचलली ‘ही’ पावले!

101

2050 पर्यंत मुंबईचा काही भाग पाण्याखाली जाण्याचे भाकीत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आता याच पार्श्वभूमीवर मुंबईला बुडण्यापासून वाचवण्यासाठी महापालिकेने वातावरण कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याचे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

…तर हे भाग पाण्याखाली

मुंबईत वाढलेले काँक्रीटीकरण, बदललेला पावसाचा पॅटर्न, तसेच समुद्राची वाढत असलेली पातळी, यामुळे सात बेटांच्या या शहराला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दक्षिण मुंबईतील ए, बी, सी, डी हे चार प्रभाग ७० टक्के; तर नरिमन पॉईंट ८० टक्के पाण्याखाली जाईल, असा अंदाज आहे.

( हेही वाचा :“देशात आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय पण…” )

इतके प्रकल्प सुरु

हा जगातील पहिलाच वातावरण कृती आराखडा असल्याचे सांगण्यात येत आहे. गारगार पिंजाळ धरणाचा प्रकल्प अहवाल तयार असताना, पाच लाख झाडे वाचवण्यासाठी हा प्रकल्प रद्द केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. किनारी मार्ग प्रकल्प, नियोजित मलनि:सारण प्रकल्प, समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रयत्न, गोरेगाव- मुलुंड जोडरस्ता, मध्य वैतरणा धरणातील संकरित ऊर्जा प्रकल्प पर्यावरणपूरक प्रकल्प मुंबईत सुरु असल्याचे, आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.