TheKashmirFiles काश्मिरी पंडितांचा आवाज पुन्हा दाबण्याचा प्रयत्न झाला, पण…

151

स्वातंत्र्यानंतर 40 वर्षांनी 1990 मध्ये रातोरात काश्मिरी पंडितांना घर, संपत्ती आणि काश्मिर सोडून निघून जाण्यास सांगण्यात आले. काश्मिर सोडा, धर्मांतर करा नाहीतर, मरा असे तीन पर्याय त्या काळरात्री काश्मिरी पंडितांसमोर ठेवण्यात आले. आपल्या बायका, मुलांना सोडून जा असं धमकावण्यात आलं. त्यानंतर लाखो काश्मिरी पंडितांना आपलं घर सोडून जाव लागलं. काश्मिरी पंडित त्या रात्री आपल्याच देशात विस्तापित झाले. त्यानंतर ज्या काश्मिरी पंडितांच्या घरात मुली वा बायका दिसल्या त्यांच्यावर अनन्वय अत्याचार करण्यात आले. केवळ काॅंग्रेसी राजवटीमुळे आपल्याच देशातील बांधवांना धर्मांध मुसलमानांकडून अमानुष अत्याचार सहन करावा लागला. ते दु:ख 30 वर्षांनंतर ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न झाला.

‘ती’ काळरात्र

मात्र, पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचा हा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. परंतु, यावेळी मात्र मोदी सरकार असल्याने, हा आवाज तितक्याच त्वेषाने उसळून वर येत आहे, हा प्रत्यय सोशल मिडीयावर सुरु असलेल्या समर्थनावरुन दिसून येत आहे. या चित्रपटाला देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ट्विटरवर या चित्रपटाच्या समर्थनार्थ आणि काश्मिरी पंडितांच्या झालेल्या नरसंहारावर ट्वीट करण्यात आले आहेत.

हिंदू जागा होतोय

कपिल मिश्रा नावाच्या नेटक-याने हा चित्रपट कसा गेमचेंजर ठरला ते एका चित्राच्या माध्यमातून सांगितलं आहे. या चित्राच्या माध्यमातून त्याने हिंदू जागा होत असल्याचं, दाखवलं आहे. त्यामुळे कट्टरपंथी आणि हिंदू विरोधक कसे धास्तावले आहेत हे दाखवण्यात आले आहे.

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सुद्धा ट्वीट करत, या चित्रपटाचे निर्माते विवेक अग्निहोत्री यांचं अभिनंदन केलं आहे. काश्मिरमध्ये झालेल्या नरसंहाराचं मार्मिक आणि प्रामाणिक कथा सांगण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच,या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी आणि लोकांना हा सिनेमा पाहायला प्रोत्साहित करण्यासाठी कर्नाटकात हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचे बोम्मई यांनी सांगितले.

आनंद रंगनाथन या नेटक-याने बीजेपीमधील नेत्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी बीजेपीमधील नेते हे या चित्रपटाच्या समर्थनार्थ असल्याचं म्हटले आहे. हा चित्रपट खरच कौतुकास्पद आहे. या चित्रपटातून काश्मिरी हिंदूंचे दुःख मुख्य प्रवाहात आणले गेले असल्याचे म्हटले आहे. केवळ या नरसंहाराचे निंदक बनू नका, 7 लाख कश्मिरी विस्तापीतांना घरी नेण्याचे लक्ष्य ठेवावे लागेल. असं या नेटक-याने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

भारताचा सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याने ट्वीट करत, अनुपम खैर यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. तसेच, इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षक सिनेमागृहांकडे वळल्याचा आनंद असल्याचंही त्याने आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.  लवकरच हा चित्रपट पाहायला मिळेल अशी आशा त्याने व्यक्त केली.

( हेही वाचा :‘डिलिव्हरी बाॅइज’ संबंधित पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय, आता )

भाजपाच्या नेत्या स्मृती ईराणी यांनी ‘द काश्मिर फाईल्स’ नक्की बघा असं ट्वीट केलं आहे. तसेच, निरपराधांच्या रक्तात भिनलेला हा इतिहास बघाच, म्हणजे असा इतिहास पुन्हा पुन्हा घडणार नाही, अशा आशयाचं ते ट्वीट आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.