सध्या आगामी निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या शक्तीप्रदर्शनासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ईव्हीएम मशिनबाबत नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण असल्याने एक प्रयोग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा, अशी सूचना गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. या संदर्भात मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत आपण प्रस्ताव मांडणार असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.
(हेही वाचा – बारावीचा पेपर फुटलाच नाही तर….; शिक्षणमंत्र्यांचं विधान परिषदेत निवेदन)
जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले असून अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या आहेत. तो राज्यांचा निर्णय असतो. महाराष्ट्रानेही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात असे म्हटले आहे. तर या संदर्भात पत्रकारांनी जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली.
अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ह्या ballot paper वर घेतल्या तो राज्याचा निर्णय असतो
महाराष्ट्रानी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका #BallotPaper वर घ्यावी @OfficeofUT @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @NANA_PATOLE #NoEVM— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 13, 2022
महाराष्ट्रातील निवडणूका मतपत्रिकेवर घ्याव्यात
कर्नाटकमध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात आल्या आहेत. निवडणुका कशा घ्याव्यात, हा निर्णय राज्य सरकारचा असतो. एकीकडे ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंकाकुशंका निर्माण होत असताना प्रयोग म्हणून का होईना, महाराष्ट्रातील निवडणूका मतपत्रिकेवर घ्याव्यात, असा आग्रह जितेंद्र आव्हाड यांचा आहे. पुढे ते असेही म्हणाले की, माझी ही भूमिका मी आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार आहे. राज्याच्या निवडणूका पाहता तो अधिकार राज्याचा असल्याने यावेळेस मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Join Our WhatsApp Community