सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेला द काश्मीर फाईल्स या सिनेमाचा विषय राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनातही चर्चेला आला. हा चित्रपट राज्य सरकारने करमुक्त करावा, अशी मागणी भाजपाचे आमदार प्रवीण दटके यांनी केला.
चित्रपटाला विरोध होत असल्याचा उल्लेख
‘द काश्मीर फाईल्स’ हा केवळ चित्रपट नसून सत्य परिस्थिती आहे. परंतू ही सत्य परिस्थिती काही सेक्युलर मंडळींना आवडलेली दिसत नाही. त्याचमुळे सिनेमाचे पोस्टर काढून टाकणे, सिनेमा सुरू असताना जाणीवपूर्वक आवाज बंद करणे, प्रेक्षकांना अडवणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे आमची मागणी आहे की चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी. बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांविषयी वेळोवेळी सहानुभूती दर्शवली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की ‘द काश्मीर फाईल्स’सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करावा, असे प्रवीण दटके म्हणाले आहेत. अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात 1990 च्या नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा मांडण्यात आली आहे.
(हेही वाचा #TheKashmirFiles: गोवा, महाराष्ट्रात आता ‘फिल्म जिहाद’)
Join Our WhatsApp Community