शेतक-यांना आधिच वातारणाच्या बदलाचा फटका बसत आहे. त्यातच आता सोलापूरमधील शेतक-यांसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. द्राक्षांच्या बागांना कीड लागू नये, म्हणून कीडनाशकाची फवारणी केली असता, द्राक्षांच्या बागा जळाल्या आणि घड सुकून गेले. हा असा प्रकार घडल्याने, शेतकरी मात्र तणावाखाली आले आहेत.
प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत उघड
द्राक्ष बागा जळाल्या, तर द्राक्षाचे घड कुजले. हे सर्व अचानक झाले आणि ऐन तोडणीच्या प्रसंगीच झाल्याने शेतकऱ्यांनी या कीटकनाशकामुळेच झाले असल्याची शंका उपस्थित केली. संबंधित विक्रेता प्रतिसाद देत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी थेट प्रयोगशाळेत या कीटकनाशकाची तपासणी करण्याचे ठरवले. याकरिता द्राक्षांचे देठ आणि काड्यांचा नमुना पाठवण्यात आला होता. यावरुन हे समोर आले आहे.
( हेही वाचा: मला विचारलेले प्रश्न आरोपीचे! फडणवीसांनी सरकारचा उघड केला मनसुबा )
कारवाईची मागणी
कीटकनाशकाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आवश्यक असलेल्या क्लोरपारिफॉसचे प्रमाण हे प्रमाण हे 1.5 असे असल्याचे कंपनीने दाखवले आहे. पण प्रत्यक्षात तपासणी केली असता, हे प्रमाण केवळ 0.52 च असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या रासायनिक कीटकनाशकाचा काही परिणाम तर झाला नाही पण ग्लायफोसेटचे प्रमाण 0.602 मिलीग्रम असे होते. यावरुन तणनाशकाचेच प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. शेतक-यांनी या सर्व प्रकारावर कारवाईची मागणी केली आहे.
Join Our WhatsApp Community