मालमत्ता कर भरलात ना? ‘ही’ आहे अंतिम संधी !

130

मालमत्ता कर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत असल्याने व यामधून प्राप्त होणा-या महसूलातूनच विविध नागरी सुविधा कामे केली जात असल्याने, नियमित कराच्या वसूलीप्रमाणेच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी थकित मालमत्ताकराच्या वसूलीकडेही तितकेच बारकाईने लक्ष दिले आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी थकीत मालमत्ता कर धारकांना आणखी एक संधी देत 15 मार्च ते 31 मार्च या कालावधीकरता ”विशेष मालमत्ता कर अभय योजना” जाहीर करत अंतिम संधी दिलेली आहे.

कालावधी संपुष्टात

तथापि मागील दोन वर्षांपासून कोवीड प्रभावित काळातील लॉकडाऊन तसेच कोवीड लाटेच्या कमी-अधिक झालेल्या प्रभावामुळे अनेक जणांच्या उद्योग, व्यवसायावर तसेच नोकरीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. विविध स्तरांतील नागरिकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी 1 ऑक्टोबर 2021 पासून थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रकमेवर 75 टक्के इतकी मोठ्या प्रमाणावर सूट देणारी अभय योजना लागू केली होती व त्यास मुदतवाढही दिली होती. 28 फेब्रुवारी रोजी या अभय योजनेच्या मुदतवाढीचा कालावधी संपुष्टात आलेला आहे.

( हेही वाचा :चहा- काॅफीचे व्यसन जरा कमी करा, कारण )

आता अंतिम संधी 

सन 2021-22 चे आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपुष्टात येत असून, तत्पूर्वी अभय योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेल्या मालमत्ता कर थकबाकी धारकांकडून थकीत मालमत्ता कर भरण्याविषयी सकारात्मक भूमिका दर्शवण्यात आली आहे आणि आयुक्तांकडे अभय योजनेची मुदत वाढवण्याविषयी विनंती करण्यात आलेली आहे.कोवीड परिस्थितीमुळे सध्याचा आर्थिक अडचणींचा काळ व नागरिकांमध्ये थकीत मालमत्ता कर भरण्याविषयी असलेली सकारात्मक भावना या दोन्हींचा विचार करून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी थकीत मालमत्ता कर धारकांना आणखी एक संधी देत 15 मार्च ते 31 मार्च या कालावधीकरता ”विशेष मालमत्ता कर अभय योजना” जाहीर करत अंतिम संधी दिलेली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.