मागील २-३ वर्षे मी पाहत आहे, सुरुवातीला अर्थसंकल्पात कमी महसुली तूट दाखवायची आणि नंतर मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्या आणून महसुली तूट वाढवली जाते. त्यामुळे हा महसुली तुटीचा आकडा फसवा आहे. आज मांडले गेलेले बजेट जे दिसते ते बजेट वेगळे आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
३१ मार्चला ३१ टक्के निधीची तरतूद
राज्याच्या अर्थसंकल्पवरील चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर घणाघाती हल्ला केला. सरकारने वर्षभर निधी उपलब्ध करून दिला नाही आणि ३१ मार्च या एक दिवसांत मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, मागील वर्षी ३१ मार्चला ३१ टक्के निधी दिला गेला. एक दिवसात इतका खर्च होतोच कसा, हे आर्थिक बेशिस्तीचे दर्शक आहे, असाही आरोप फडणवीस यांनी केला.
(हेही वाचा अर्थसंकल्पात राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी! फडणवीसांनी काय केला भांडाफोड?)
नव्या बाटलीत जुनी दारू
मी मुख्यमंत्री असताना राज्याची अर्थव्यवस्था ही ट्रिलयन डॉलर करण्याची संकल्पना मांडली होती, तेव्हाचे विरोधक जे आजचे सत्ताधारी आहेत, त्यांनी माझा उपहास केला, मात्र तिच संकल्पना आज अर्थमंत्र्यांनी स्वीकारली, आमच्या अनेक गोष्टी आधी नाकारल्या होत्या, आता ते स्वीकारत आहेत, असे सांगत पंचसूत्री विकासाची थीम घेतली हे चांगलेच आहे, मात्र त्या अर्थसंकल्पात अशा कुठल्याच योजना दिसल्या नाहीत. अर्थसंकल्पात सध्या चालू असलेल्या योजना, आमच्या काळातील योजना यांचाच उल्लेख आहे. या सरकाराला मद्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू, असा आहे, असेही फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community